Share

IPL 2022 MI vs SRH : टिम डेव्हिडला आऊट होताना पाहून सारा तेंडुलकरची भयानक रिअ‍ॅक्शन व्हायरल; पाहा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६५वा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदरबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने मुंबईचा ३ धावांनी पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १९० धावांपर्यंत मजल मारू शकला. सामना मुंबईने गमावला मात्र मुंबईचा तुफानी फलंदाज टिम डेव्हिडने सगळ्यांची मने जिंकली. त्याने सामन्यात आपल्या आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्यांची फलंदाजी पाहून मुंबईच्या चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला. टिम डेव्हिडने सामन्यात ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तुफान फटकेबाजी केली. त्याने १८ चेंडूत ४६ धावा फटकावल्यानंतर तो धावबाद झाला. त्याला बाद होताना पाहून सारा तेंडुलकर शॉक झाली. सध्या सोशल मिडीयावर तिची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.

टिम डेव्हिड आक्रमक फलंदाजी करत असताना टी नटराजनच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. त्याला बाद होताना पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आश्चर्यचकित झाली आणि तिने चक्क तोंडालाच हात लावला. तिची रिअ‍ॅक्शन सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईसाठी रोहित-इशानने चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधली फळी ढासळल्यानंतर टिम डेव्हिडने धुवांधार फलंदाजी करत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, पण १८व्या षटकात तो बाद झाला आणि मुंबईने सामना गमावला. हा मुंबईचा दहावा पराभव ठरला.

महत्वाच्या बातम्या: 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!