मुंबई : भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 16 मेला पुणे दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केले. स्मृती इराणी यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आमने-सामने आले. या आंदोलनात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उचलल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पाश्वर्भूमीवरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. याला आता आमदार राम सातपुते यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
“पवार घराण्याचे युवराज तुमच्या पवार साहेबांचे भाषण सुरु असताना सभा कोणी उधळायचा प्रयत्न केला तर योग्य असेल का ? उगाच नाकाने वांगे सोलायचे उद्योग थांबवा. यामुळेच तुमचा पक्ष साडेतीन जिल्ह्यातच अजून गटकाळ्या खातोय. संस्कार आणि संस्कृती फक्त भाजपनेच पाळायची का? “, असा प्रश्न राम सातपुते यांनी उपस्थित केला.
ओ पवार घराण्याचे युवराज तुमच्या मा.पवार साहेबांचं भाषण सुरु असताना सभा कोणी उधळायचा प्रयत्न केला तर योग्य असेल का ? उगाच नाकाने वांगे सोलायचे उद्योग थांबवा .
यामुळेच तुमचा पक्ष साडेतीन जिल्ह्यातच अजून गटकाळ्या खातोय.संस्कार आणि संस्कृती फक्त भाजपनेच पाळायची का.?@RRPSpeaks https://t.co/jSKGuGdIl3— Ram Satpute (@RamVSatpute) May 18, 2022
काय म्हणाले होते रोहित पवार ?
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असे रोहित पवार म्हणाले होते. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे, आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- “…मात्र ठाकरे सरकारची ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती”, ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्ये यांचा टोला
- किरीट सोमय्या Vs संजय राऊत वाद थेट कोर्टात; राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल!
- IPL 2022 : मुंबईला हरवल्यानंतर केन विल्यमसननं सोडली संघाची साथ..! कोण होणार हैदराबादचा ‘नवा’ कॅप्टन?
- “शरद पवारांच्या लेन्सेसमधून पाहण्याचं भाग्य…” ; पंकजा मुंडेंचे भाऊ धनंजयबाबत वक्तव्य
- OBC Reservation : “…मग महाराष्ट्राला हा न्याय का लागू होत नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा सवाल

