Share

OBC Reservation : “ओबीसींबद्दल नकली प्रेम दाखवणे सोडून…”, चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाच्या फक्त बाता मारल्या त्यासाठी प्रयत्न मात्र शून्य. न्यायालयाने सांगूनही ट्रिपल टेस्ट केली नाही इम्परिकल डेटाही गोळा केला नाही वर निर्लज्जपणे केंद्रावर बोट ठेवले.ओबीसींबद्दल नकली प्रेम दाखवणे सोडून मध्यप्रदेश सरकारकडून शिका जरा.”, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

दरम्यान ओबीसी आरक्षणा संदर्भात ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याशिवाय ओबीसी आरक्षण देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने  स्पष्ट केले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. तर इकडे महाराष्ट्रातही यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!