Share

जर पोलीसच गंभीर गुन्ह्यात सहभागी असतील तर कायदा-सुव्यवस्था राहील का?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. काल रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सरकार मधी काही लोक सचिन वाझे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.

तसेच, ‘हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. जर का एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये पोलीसच सहभागी असतील तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राहील का? ज्यांना अटक झाली तेच त्या प्रकरणाचे तपास अधिकारी होते आणि सरकार त्यांना पाठीशी घालत होते. त्यामुळे हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे. आणि याचे पाळे-मुळे खूप खोलवर रुतलेले आहेत.’ असे घणाघाती आरोप फडणवीस यांनी यावेळी केलेला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!