मुंबई: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे. त्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील आता या मुद्यावरून राज्य सरकारला चांगलीच चपराक लगावली आहे.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी जनगणनेची गरज नाही, इम्पिरिकल डाटा तयार करूनही ओबीसींना आरक्षण मिळेल, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
‘ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुकी कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल. या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील. आरक्षण नसलं तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाही. आज सरकारची मानसिकता दिसत नाही, त्यामुळे आम्ही आवाज उठवू. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या,’ अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि महाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यानंतर त्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका राज्यानं दाखल केली, तीदेखील सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केली. त्यामुळं महाराष्ट्रात ओबीसीकरता कोणतंही आरक्षण राहिलेलं नाही, ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांना दिलासा : मद्यविक्रीसह इतर दुकानांना ‘या’ वेळेत परवानगी !
- मोठी बातमी! शासकीय कामात अडथळा; शिवसेना आ.प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा
- ‘महाविकास आघाडीकडून मराठा समाज आणि ओबीसींत भांडणं लावण्याचा प्रयत्न’
- ‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण
- ‘त्या’ ३० नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या केली!, गिरीश महाजनांनी मौन सोडले


