Share

पुणेकरांना दिलासा : मद्यविक्रीसह इतर दुकानांना ‘या’ वेळेत परवानगी !

Published On: 

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. एप्रिल महिन्यात पुण्यात पाच ते सहा हजारांहून अधिक रुग्णांची संख्या नोंदवली जात होती. मात्र, कडक निर्बंधांमुळे ही संख्या आता १ हजाराच्या आत आली असून पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे आता पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आता मॉल्स वगळता सर्वच दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे.

कोणकोणत्या बाबींमध्ये सूट –

१) १४ एप्रिल व २८ मे च्या अदेहसनुसार अत्यावश्यक सेवांसाठीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.

२) पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील.

३) अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर दुकाने (मॉल्समधील दुकाने वगळता) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.

४) रेस्टोरन्टस व बार हे पार्सल/ घरपोच सेवांसाठी १४ एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.

५) ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर वस्तू (Includes non-essential also) यांची घरपोच सेवा सुरु करण्यास मुभा.

६) दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व उत्तरं अत्यावश्यक कारण/ सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास पूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) लागू राहील.

७) सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक/कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त) २५ % अधिकारी अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.

८) कृषी संबंधित सर्व दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.

९) मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.

वरील सर्व नियम व सूट १ जून २०२१ पासून पुढील १० दिवस लागू राहतील. यानंतर पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी रेटचा आढावा घेऊन पुढील आदेश देण्यात येतील.

पुण्यात आज दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या !

आज पुणे शहरात १८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७५१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार २० इतकी झाली असून ८३३ रुग्ण हे गंभीर आहेत. तर, १ हजार ५८१ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. दरम्यान, आज कोरोनामुळे २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!