Share

‘हिंदूंच्या सणांविरुद्ध नाही तर मग मोहरमला सशर्त परवानगी आणि दहीहंडीवर सरसकट बंदी का?’

Published On: 

मुंबई : आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल.’ असे मत आज उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याबाबत भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हणले आहे कि, ‘आम्ही हिंदूंच्या सणांविरुद्ध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्याना करावा लागला, यातच सर्व आलं. जनता पाहतेय की ठाकरे सरकारने आधी दारूची दुकाने उघडली, मंदिरे अजून बंद आहेत. राज्यातले सत्ताधारी मात्र चोरून मंदिरात दर्शन घेतात. मोहरमला सशर्त परवानगी मिळते आणि दहीहंडीवर सरसकट बंदी येते.’ अशी टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!