मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं मुव्ही माफियांविरोधात युद्ध छेडलं होतं. व्हिडीओ शेअर करत तिनं अनेक खुलासे केले होते. बॉलिवूडमधील बडे लोक स्टार किड्स आणि बाहेरून आलेल्या लोकांसोबत भेदभाव करतात असं सांगत तिनं नेपोटीजमवरही भाष्य केलं होतं.
घराणेशाहीवर केलेले आरोप सिद्ध करुन दाखवले नाहीत तर पद्मश्री हा पुरस्कार परत करण्याचे खळबजनक विधान केले आहे.ती म्हणाली, ‘मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं होतं. मनालीमध्ये असल्यामुळे कोणाला तरी माझा जबाब नोंद करण्यासाठी पाठवा अशी मी पोलिसांकडे मागणी केली. परंतु आतापर्यंत मला मुंबई पोलिसांकडून काहीच उत्तर मिळाले नाही.
‘ रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने वक्तव्य केलं. शिवाय, मी असं काही बोलत असेल जे मला सिद्ध करता येणार नाही, तर मी माझा पद्मश्री हा पुरस्कार तुम्हाला परत करेन’ असे कंगना म्हणाली.
स्वरा भास्कर, तापसी पन्नू यांनाही कंगना हिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना लक्ष्य केले. तिने म्हटले आहे की, स्वरा भास्कर आणि तापसी पन्न या गरजू अभिनेत्री उठतील आणि म्हणतील बॉलीवूडवर आमचे प्रेम आहे. असे म्हटले म्हणून त्यांना आलिया आणि अनन्या यांच्यासारखे काम मिळणार नाही. हाच बॉलीवूडमधील घराणेशाहीचा पुरावा आहे.
महत्वाच्या बातम्या-
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…भूमिपूजनाची तारीख ठरली,सुरु झाली जय्यत तयारी
छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

