अयोध्या : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने काल (शनिवार) एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.
निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली.
भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
दरम्यान, रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…देशाच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. मंदिराचे बांधकाम साडेतीन वर्षांत बांधकाम पूर्ण होणार आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांंनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय कोर्टाकडे होता. आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसतील.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला
शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’
५०० कोटींचा दावा करणाऱ्यांनी एकदा डॉक्टरकडे जाऊन स्वत:ला तपासून घ्यावे – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

