सोलापूर : राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते भालचंद्र पाटील यांच्या निधनानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माळशिरसमध्ये जाऊन पाटील कुटुंबाची भेट घेतली. भालचंद्र पाटील यांचे पुत्र रमेश पाटील यांना भेटून पवारांनी सांत्वन केले. पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.
शरद पवार माळशिरस तालुक्यातील कान्हेरमध्ये रमेश पाटील यांच्या घरी गेले होते. रमेश पाटील यांचे वडील भालचंद्र पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे पवारांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. भालचंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.
शरद पवार यांना गेली अनेक वर्ष साथ देणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा तालुका म्हणून माळशिरसची ओळख आहे. मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवारांनी माळशिरस तालुक्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते.
छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन
दरम्यान, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लोकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.
उद्या जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार नगरसेविका आणि अधिकाऱ्यांसोबत ते जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी बैठक घेतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केलं आहे.
शरद पवार रविवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी बारामतीतील ‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…भूमिपूजनाची तारीख ठरली,सुरु झाली जय्यत तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

