Share

छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन

Published On: 

🕒 1 min read

रायगड: दरवर्षी मान्सून काळात रायगडाचे वैभव हे अधिकच खुलत असते. त्यामुळे अनेक इतिहासप्रेमींसह, शिवभक्त व पर्यटकांचा राबता असतो. हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे दुर्गराज रायगड! यंदा मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच नागरिकांना वर्षा पर्यटनास बंदी असून राज्यातल्या गड-किल्ल्यांवर जाण्यास देखील बंदी आहे.

गेली अनेक वर्ष पुरातत्व खात्यासह अनेक दुर्गसंवर्धन संघटनांना सोबत घेऊन खासदार छत्रपती संभाजी राजे हे रायगडास गत-वैभव देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणानंतर्गत डागडुजीची कामे करत आहेत. मग नाणे दरवाजा असो व पायी पायऱ्यांसाठीची तटबंदी! मागे  हत्तीतलावातील गाळ काढण्यासोबतच तलावाला लागलेली गळती बंद करण्यासाठी काम करण्यात आले होते.

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु; दक्षता घेण्याचे आवाहन 

त्यामुळेच जुन्या जाणकार गावकऱ्यांच्या अंदाजानुसार तब्बल दीडशे वर्षानंतर हा तलाव पूर्ण भरला आहे. याच्या व्हिडिओज अनेक दिवस व्हायरल होत होत्या. तर खुद्द संभाजीराजेंना देखील हा तलाव पूर्ण भरल्याचे दृश्य पाहण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणूनच ते थेट रायगडी गेले व मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन केले. या नंतर या निळ्या शुभ्र दिसणारे तलावाचे पाणी देखील ते प्यायले. त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांसह अनेक मावळ्यांची तहान या तलावाच्या पाण्याने भागवली असेल.

‘कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या’, भाजपा नेत्याचा अजब सल्ला

यावर खासदार छत्रपती सांभाजी महाराज यांनी सोशल मिडियावर स्वतःच्या भावनांसह व्हिडिओ देखील पोस्ट केली आहे. ते लिहितात-

भरलेला हत्ती तलाव बघण्याची ओढ मनाला अनेक दिवसांपासून लागली होती. तसेही रायगड संवर्धनाची जबाबदारी घेतल्यापासून कामांचा आढावा घेण्यासाठी गडावर नेहमी येतच असतो. पण, कोरोनामूळे  मनात असूनही येता येत नव्हते. हत्ती तलाव भरल्याची माहीती मिळाली तेव्हा पासून हा भरलेला तलाव पाहण्यासाठी मी फारच उत्सुक होतो.अखेर काल गडावर येऊन हे नयनरम्य दृष्य पाहीलेच.

भर पावसात रायगड पाहण्याचा आनंद वेगळाच! काठोकाठ भरलेल्या हत्ती तलावातील पाण्याचे पुजन यावेळी करण्यात आले. गडावरची निर्गुडीची पाने, रान फुले वाहून अगदी साधेपणाने परंतु मनोभावे जलपूजन केले. रायगड विकास प्राधिकरणाला मिळालेले हे यश अभूतपूर्व आहेच पण, गडावरील वास्तूंच्या इतिहासात प्राधिकरणाचे अमुल्य योगदान सुद्धा आहे. प्राधिकरणाच्या संबंधित सर्व सदस्य, तज्ञ, अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी अहोरात्र केलेल्या  कष्टाचे आणि सर्व शिवभक्तांच्या पाठिंब्याचे हे फलीत आहे.

हत्ती तलावात भरलेले निळेशुभ्र पाणी पाहून ते पिण्याचा मोह मी रोखू शकलो नाही. या तलावातील पाणी कदाचित शिवछत्रपती, संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी सुध्दा पिले असेल, असा विचार मनात क्षणभर तरळून गेला. त्याकाळी असंख्य मावळ्यांची तहान या तलावाच्या भागवली असेल.

तलावाला अजूनही एक-दोन ठिकाणी गळती आहे, त्याच काम येत्या काही दिवसात करण्यात येईल.यापूर्वीही या तलावाची गळती काढण्यासाठी पाच ते सहा वेळा प्रशासनाकडून प्रयत्न झाले होतेअसे म्हणतात.पण, कुणालाही यश मिळाले नव्हते. यावेळा आपण यशस्वी झालो.

धोका टळला : शिवसेनेच्या ‘त्या’ मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!