Share

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला

Published On: 

🕒 1 min read

पुणे- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक सवर्सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी,राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नुकतेच पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचे कोरोना विषाणूची बाधा झाल्याने उपचारा दरम्यान निधन झाले असताना आता जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय 58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दिनेश दुबे यांनी नगरपरिषदेचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे  आमदार बाबाजानी दुर्राणी यांना देखील कोरोना विषाणु संसर्ग झाला आहे. औरंगाबाद येथे करण्यात आलेल्या रॅपीट अॅन्टीजन टेस्टमध्ये ही धक्कादायाक बाब समोर आली आहे.

आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मंत्र्यांसाठीची वाहन खरेदीची फाईल क्लिअर होतेय मात्र, कोरोना योद्ध्यांच्या वेतनाची फाईल अडकून राहतेय’

५०० कोटींचा दावा करणाऱ्यांनी एकदा डॉक्टरकडे जाऊन स्वत:ला तपासून घ्यावे – फडणवीस

यंदा आयपीएलची परदेशवारी निश्चीत ?

ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना, मुंबईत गुन्हा दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!