🕒 1 min read
मुंबई : मुस्लिमांनी भोंग्यांच्या मुद्द्याला धार्मिक वळण दिले तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असा पुनुरुच्चार करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण भोंगा आंदोलनावर ठाम आहोत, असे स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेतली.
आवाजाचा त्रास होत असेल तर मंदिरावरचे सुद्धा भोंगे उतरवा. महाराष्ट्रात आम्हाला दंगे नकोत पण भोंगे उतरायलाच हवे. जोपर्यंत सरकारकडून निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, ९२ टक्के ठिकाणी अजान झाली नाही म्हणून खुश होण्याच कारण नाही. मुस्लिमांनी धार्मिक वळण दिले तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असे राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच मनसैनिकांची धरपकड कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला आहे.
तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले, भोंग्यांचे आवाज बंद झाले पाहिजेत नाहीतर आंदोलन सुरूच राहणार. कायद्याचा प्रश्न पोलिसांनी बघून घ्यावा. प्रार्थनेला बंदी नाही, भोंगे बंद करा. फक्त लोकांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा आहे. अजानसाठी स्पीकर आणि माईक कशासाठी? मनसैनिकांची धरपकड कशासाठी? असेही सवाल यावेळी उपस्थितीत केले.जता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला भोंगा आंदोलनाची पुढील दिशा याबद्दल सविस्तर सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
