मुंबई : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन अतिशय वादळी ठरले असल्याचे कालपासून पाहायला मिळाले. काल अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.
यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे. अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘ शरमेनं मान खाली जाईल असं कालचं दृश्य होतं. मी नवीन आमदार आहे. पण कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, बाळासाहेब थोरात हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. त्यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला.
माझ्या पहिल्याच कारकिर्दीत मला हा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे मी अवाक् झालो. ही लाजीरवाणी घटना आहे. यातून आपण कामाचा दर्जा उंचावतो की दर्जा खालावतो याचं भान विरोधकांना राहिला नाही. विरोधकांचं असं वागणं महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. शरमेनं मान खाली जावं असं दृश्य होतं. जबाबदार विरोधी पक्षाकडून हे होणं वाईट आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी आम्ही जनतेच्या जीवाशी खेळणार नाही. राजकारण करणार नाही. आम्ही एवढे नीच वागणार नाही,’ अशी तिखट प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- ‘भाजपच्या नेत्यांचा तोल गेला ; सभागृहात काल जे घडले ते अत्यंत अशोभनिय’
- कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश शिवसेना-कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- …अन् उद्धव ठाकरेंसमोरच अजित पवार म्हणाले, ‘शिवसैनिक असूनही त्यांनी फिजिकल काही केलं नाही’
- ‘स्टंट’बाजी करून पाप झाकण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचे भाजपवर टीकास्त्र


