🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वीच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘केंद्र सरकारला वाटत आहे की इन्कम फक्त महाराष्ट्रातच आहे. सर्वाधिक टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्रच देतो. महाराष्ट्राच्या लोकांना अशा प्रकारे त्रास देणे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छळ करणं याची नोंद महाराष्ट्रातली जनता घेतेय’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारे बदनामीची मोहीम सुरू आहे. परंतु फार काळ हे चालणार नसून आमचे लक्ष आहे. आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत. पण महाराष्ट्र वाकणार नाही’, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- दिशा सालियन प्रकरणी पोलिसांचा महिला आयोगाकडे अहवाल सादर; रुपाली चाकणकरांनी दिले ‘हे’ निर्देश
- “उद्धव ठाकरेंचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…”, दिशा सालियन प्रकरणावरून भातखळकरांचे टीकास्त्र
- Russia-ukraine War: युक्रेनने करून दिली अमेरिकेतील ‘त्या’ हल्ल्याची आठवण; ट्वीट चर्चेत
- “भारतीय ध्वज पाहून…”, युक्रेनमधून परतलेल्या बिहारच्या विद्यार्थ्याने सांगितली आपबिती
- भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?- सचिन सावंत


