🕒 1 min read
Abdul Sattar । मुंबई : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवी दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. सर्व स्तरातून सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीने ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर जहरी टीका केली आहे.
ते म्हणाले, “सत्तार हे जोकर आहेत. त्यांना एखादे नाटक किंवा तमाशात भूमिका द्यायला हवी.” तसेच अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही शिंदे-फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. आता अब्दुल गद्दार यांचा महाराष्ट्रात कसा कार्यक्रम होतो, याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाहणार असल्याचं मेहबूब शेख (Mahebub Shaikh) म्हणालेत.
“अब्दुल गद्दार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली आहे. ते ऐकून एखाद्या सामान्य युवकाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. मात्र आमच्या अंगावर कोणी आलं तर त्याला शिंगावर घेण्याची ताकद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. सत्तार यांच्या विधानानंतर औरंगाबाद, सिल्लोड तसेच मुंबईमध्ये जे पडसाद उमटले ते किरकोळ आहेत. उद्या आम्ही यापेक्षा उग्र अवतार धारण करणार आहोत,” असा इशाराही त्यांनी दिलाय.
“सत्तार राजकारणातील जोकर आहेत. सत्तार यांना धडा शिकवण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. ते आमच्या नेत्यांविषयी बोलत असतील, तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सत्तार हे शिंदे-फडणवीस यांचे वाचाळवीर आहेत. सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची त्यांची हिंमत नाही. यांना सरकार वाचवण्यासाठी अशा वाचाळवीरांसमोर नतमस्तक व्हावे लागत आहे. सत्तार राज्याचे कृषीमंत्री असल्यामुळे जनतेला लाज वाटत आहे” अशी घणाघाती टीका करत मेहबूब शेख यांनी सत्तारांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bharat Jodo Yatra | काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचा भारत जोडो यात्रेत निधन
- Car Special Discount Offer | ‘या’ कारवर मिळत आहे बंपर ऑफर, तुम्ही पण घ्या संधीचा फायदा
- Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का? ; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण
- iPhone 14 Price | iPhone 14 मिळत आहे 7 हजार रुपयांनी स्वस्त, कसा? ते जाणून घ्या!
- Amol Mitkari | “… म्हणून अब्दुल सत्तारांनी कुत्रा ‘ही’ निशाणी मागितली होती”, अमोल मिटकरी सत्तारांवर कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
