Share

डब्ल्युटीसीच्या फायनलमध्ये भारत विजयी झाल्यास रोहितच्या नावे होणार ‘हा’ अनोखा विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्व क्रिकेट रसिकांना आता उत्सुकता लागली आहे. ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना इंग्लंडमध्ये भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात सहभागी भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माला एक अनोखा विक्रम नोंदविण्याची संधी आहे.

या सामन्यात खेळायला उतरल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्याच्या विक्रमाची नोंद करतील. रोहित शर्मा हा पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात सहभागी होता. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ आणि आता जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना या प्रकारे तो आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सहभागी होणारा खेळाडु ठरेल. तर कर्णधार विराट कोहली हा २०११ चा विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी-२० विश्वचषक आणि आता जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अशा प्रकरे क्रिकेटच्या तिनही प्रकारात तो अंतिम सामन्यात खेळेल.

मात्र या सामन्यात भारताने जर विजय मिळवला तर रोहित शर्मा हा क्रिकेटच्या तिनही प्रकारात आयसीसीच्या अंतिम फेरीत विजय मिळवणारा तो एकमेव खेळाडु ठरेल. डब्ल्युटीसी स्पर्धेत रोहित शर्माने ११ सामन्याच खेळताना १७ डावांत ६४.३७ च्या लाजवाब सरासरीने १०३० धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणेनंतर या स्पर्धेत भारताकडून तो सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!