Share

‘मी गॅंगस्टर होतो तर मुख्यमंत्री कसं केलं ?,’ राणेंचा शिवसेनेला सवाल

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

सुनावणी दरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे. तसेच राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे हजेरी लावण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज राणेंवर सडकून टीका करण्यात आली होती. याचा देखील यावेळी त्यांनी समाचार घेतला. राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका सामानातून करण्यात आली होती. ‘ मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मुख्यमंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?,’ असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राणेंची अटक आणि सुटका –

राणेंना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. आता उच्च नायालयाने देखील नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!