Share

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर…”, किरीट सोमय्या यांना धमक्यांचे फोन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे. एकीकडे विरोधी पक्ष भाजपाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं याबाबत संयमाची भूमिका घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे.

यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच हवा असं म्हटलं आहे. मात्र किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ते सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच रविवारी सकाळी ११.३० वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व ६ बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या २ दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच आहे. याबाबत मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून कळवलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. फक्त तक्रार नोंद केली आहे अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाची बातमी 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!