🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.
दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या काही टोले लगावले आहेत. तसेच औरंगाबादचे नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसला आमनेसामने आणू नये, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
यावर आता कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ मध्ये असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहोत.काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’शिकवण्याची काहीच गरज नाही.आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यानंतर पुढे बोलता येईल.’ अस यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
https://twitter.com/AdvYashomatiINC/status/1350723907062431745?s=20
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही थंडीने मरत आहोत मात्र सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ देत आहे”
- देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – वर्षा गायकवाड
- राज्यातच नाही तर देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणी आग्रही असू नये; राऊतांचा काँग्रेसला टोला
- औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सहा महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आदित्य ठाकरे
- अर्थसंकल्पापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा केंद्र सरकारला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
