Share

काँग्रेसला ओबीसींचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, चंद्रशेखर बावनकुळेंचे आव्हान

Published On: 

नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला चांगलेच फैलावर धरले आहे. सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच असा आरोप केला आहे. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींची एवढीच कळकळ असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असे वंजारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?,असा सवालदेखील त्यांनी केला आहे.

सरकारने लवकर इम्पेरीकल डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण देण्यासाठी हालचाली कराव्यात असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच येणारी २०२२ ची निवडणूक ओबीसी आरक्षणानुसारच झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि सरकारने ते करून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!