मुंबई: आयपीएल २०२२ चा २९ वा सामना आज पुण्यातील MCA स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सने गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नईला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. ज्यात सीएसकेने गुजरातसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईने (CSK) चांगली सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj gaikwad) बॅटला या सामन्यात सूर गवसला आहे. रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतरही त्याने आपली खेळी सुरूच ठेवली. ऋतुराजने गुजरातच्या गोलंदाजांना धुवून काढत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. ज्यात ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
Rutu raj-yam at the crease today! ????#GTvCSK #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/Cqucgoi2II
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2022
ऋतुराजच्या जोडीने अंबाती रायडूनेही महत्वपूर्ण ४६ धावांची खेळी केली. ज्यामुळे चेन्नई १६९ पर्यंत पोहचू शकला. चेन्नईची सुरुवात बघता मोठ्या धावा येतील असे वाटत असताना गुजरातनेही चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात पर्दापण करणाऱ्या अल्झारी जोसेफने २ विकेट्स पटकावल्या. तर या सामन्यात कर्णधार असलेल्या राशिदला एकही विकेट मिळवता आली नाही.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : आकाश चोप्राने साधला पंजाबच्या ‘या’ बॉलरवर निशाणा; म्हणाला “तो नेहमी ४० धावा देतो”
- IPL 2022 : एक मॅच दोन रेकॉर्ड..! पंजाबविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार चमकला; ठोकलं दीडशतक!
- IPL 2022 : ऋषभ पंतने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ खास रेकॉर्ड, बनला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
- क्लास इज पर्मनंट..! IPL 2022 दरम्यान CSKच्या माजी खेळाडूनं इंग्लंडमध्ये ठोकलं शतक; पाहा VIDEO!
- IPL 2022 : CSKच्या ‘स्टार’ खेळाडूंची पुणेकरांना मराठीतून साद..! तुम्ही पाहिला का ‘तो’ VIDEO?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

