मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून येत्या २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपली आहे. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली.
यावेळी आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली. शरद पवार आणि संभाजीराजे यांच्या भेटीवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत थेट खा. संभाजीराजे यांनाच लक्ष केले आहे. ‘संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही. https://t.co/BDcXXdl7QM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 27, 2021
दरम्यान, शरद पवार आणि संभाजीराजे यांच्या भेटीत जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.
महत्वाच्या बातम्या
- मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये
- संपुर्ण कारकिर्दीत केवळ एका टी-२० सामन्यात खराब कामगिरी केल्याचा ‘या’ भारतीय गोलंदाजाचा दावा
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीच्या घोळात अडकली का? भाजपाचा राज्य सरकारला सवाल
- शाहरुख खानच्या लहान मुलाने ‘या’ चित्रपटातून केले बॉलीवूडमध्ये पदार्पण !!
- २०१५ मध्ये प्रधानसेवकांनी केलेल्या वक्तव्याची नवाब मलिक यांनी करुन दिली आठवण, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

