मुंबई : देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले. तसेच जर भाजपचा पूर्ण पराभव झाला, तर पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. लोक पेट्रोल पंपावर १५ ते २० रुपयांचे पेट्रोल भरतात आणि समोर लागलेल्या मोदींच्या फोटोतून म्हटले जाते, आम्हाला मतदान दिल्याची किंमत चुकवा. असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
फक्त ५ रुपयांनी पेट्रोल दर कमी करून काय होणार? असा सवाल करत किमान २५ रुपयांनी तरी दर कमी करायला हवे होते. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
पेट्रोल-डीजेल भाववाढ करून केंद्राने १२७ लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. मात्र हे दिवस २०२४ साली जातील असा दावाही त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल ५ आणि डिझेलच्या दरात १० रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये ३ वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे. आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ६.०७ रुपये आणि ११.७५ रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ आणि ९४.१४ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- T20 WC: भारतीय संघ अजूनही गाठू शकतो उपांत्यफेरी; जाणून घ्या कसं!
- केंद्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!


