Share

‘राज्यातही भाजपचं सरकार आलं तर बंगाल डबल इंजिनप्रमाणे प्रगती करेल’

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.

नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ममता बॅनर्जी एका मंदिरात गेल्या आणि तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ उभ्या होत्या. तिथे थांबून त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये बसत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलला आणि यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले होते.

नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता.

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथे भाजपच्या विजयाचा दावा केला. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीबद्दल त्यांनी सहानुभूतीही व्यक्त केला. अपघातावर कोणतेही राजकारण होऊ नये. असे वाद निवडणुकीचे वातावरण खराब करतात असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘केंद्रात सरकार भाजपची आहे आणि जर राज्यातही भाजपचं सरकार आलं तर डबल इंजिनप्रमाणे बंगाल खूप प्रगती करेल. आम्ही बंगालमध्ये एक लाख कोटींचे रस्ते बनवू, जर आम्हाला भूसंपादन आणि पर्यावरणाची मंजुरी मिळाली असती तर आपण आजही ते बांधू शकलो असतो. पण दुर्दैवाने यात अडथळेही आहेत. ‘ ते पुढे म्हणाले, ‘ममताजींबरोबर एक अपघात झाला आणि त्याचे राजकारण केले जाऊ नये. असा वाद निर्माण करणे आणि निवडणुकीचे वातावरण खराब करणे योग्य होणार नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!