Share

जर बाळासाहेब ठाकरे दर्शन घेण्याएवढे थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीच्या चौकशीची मागणी का?- केसरकर

Published On: 

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलत असतांना ‘जर बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती’ असे म्हणत त्यांनी राणेंवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले की,’जर बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी नितीमत्तेच्या गोष्टी करू नये. नितीमत्ता काय असते हे मला माहिती आहे. बाळासाहेब जीवंत असताना त्यांना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर हे सगळे नाटकं करायची याला माझा विरोध आहे.’

पुढे बोलत असतांना त्यांनी नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की,’राणेंच्या मुलाने मला धमक्या दिल्या. या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही. कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार आहे ज्याच्या प्रॉपर्टी कमी झाल्यात. राजकारणासाठी मी माझ्या प्रॉपर्टी विकतो, कर्ज घेतो, ते कर्ज फेडतो, पण माझी नैतिकता कधी ढासळली नाही. ही नैतिकता असल्यानेच मी लढे देऊ शकतो. माझा लढा कोकणाचा विकासासाठी आहे’.

दरम्यान,’माझा राजकीय संघर्ष कधीही रक्तरंजित नव्हता. माझा संघर्ष मारामारीचा संघर्ष नव्हता. मी माझ्या मार्गाने गेलो, विरोधकांना मतपेटीतून हरवलं. मी जेव्हा माझी घोषणा केली तेव्हा मी शिवसेनेतही नव्हतो. मी राष्ट्रवादीत होतो आणि आमदार होतो. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन त्या संघर्षात उतरलो,’ यावेळी असेही केसरकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!