Share

औरंगाबादकारांनो बाहेर विनाकारण फिरणार असाल तर…..

Published On: 

औरंगाबाद: शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने ३१ मार्च पासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. झपाट्याने वाढत असलेल्या या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सध्या शहरात तसेच राज्यात राबवल्या जात आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, यावर उपाय म्हणून लॉकडाऊन हा पर्याय अखेर निवडण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या दरम्यान शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे, त्यामुळे विनाकारण जर तुम्ही बाहेर निघणार असाल तर पोलिसांच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. शहरात पोलीस विभागासह, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी एकूण ६२ फिक्स पॉइंट्स लावण्यात येणार आहेत. ३१ मार्च ते ९ एप्रिल हा लॉकडाऊन असणार आहे, या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत या सर्व फिक्स पॉइंट्सवर पोलीस तैनात असणार आहेत.

या फिक्स पॉइंट्स शिवाय पेट्रोलिंग करण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. या साठी ८ पथके तयार करण्यात आले आहेत.  तसेच दुचाकीवरूनही पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. पेट्रोलिंग करणाऱ्या पथकांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर तर लक्ष ठेवायचे आहेच, पण त्याच सोबत शहरात कुठे चोऱ्या, घरफोडी तसेच इतर कुठले गैरप्रकार होणार नाहीत याच्याकडे पण लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!