🕒 1 min read
मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावाला २५-३० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जात आहे.
जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आत्मा पवित्र मतदान आहे. पण मतदारांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. ठरावीक धनाढ्य प्रवृत्तीची मनगटशाही मतदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.काही ग्रामपंचायतींनी सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात निवडणूक आयोगानं कडक पाऊल उचललं आहे.
सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
राज्यात काही ग्रामपंचायतींमध्ये संरपंचपदाच्या झालेल्या लिलावाचे व्हिडिओ समोर आले होते. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारीही आल्या होत्या. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे.त्यामुळे आपल्या जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्यास त्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश यू. पी. एस. मदान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, हा अहवाल बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी 23 डिसेंबर 2004 च्या आदेशानुसार आयोगाकडे परवानगी मागतानाच सादर करावा, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांच्या पत्नी दिलेल्या तारखेआधीच ईडीसमोर हजर !
- ‘रिलायन्सला टार्गेट करून कृषी विधेयकांबाबत चुकीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न’
- ‘औरंगाबाद हे नाव दुर्दैवी; शिवभक्तांच्या अस्मितेचा विचार करुन सरकारने निर्णय घ्यावा’
- विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये
- ग्रामपंचायत निवडणुकांची लढत आज होणार स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

