🕒 1 min read
औरंगाबाद : भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) पतसंस्थेबद्दल शुक्रवार, १८ जून रोजी विविध दैनिक व प्रसार माध्यमांत काही बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न अंबादासराव मानकापे पाटील तसेच आदर्श महिला नागरी सहकारी बँक व आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ‘रायसोनी’ प्रकरणात आदर्श समूहाचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचा खुलासा आदर्श समुहाने केला आहे.
याबद्दल आदर्श समूहाने परिपत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. वास्तविक, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी बँक, औरंगाबाद जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्था, साईरत्न आदर्श अर्बन निधी लिमिटेड यांच्या खातेदार, ठेवीदार यांच्या ठेवींवर सदरील प्रकरणाचा दुरान्वयेही सबंध नाही. या चुकीच्या बातम्यांमुळे आदर्श समूहातील ग्राहक, ठेवीदार व खातेदारांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. आदर्श समूह सहकारावर विश्वास ठेवून मागील दोन दशकांपासून विश्वसनीयरित्या काम करत आहे. बँकेचे ठेवीदार, खातेदार यांनी कुठल्याही अफवा व चुकीच्या अपप्रचाराला बळी पडू नये. सर्वांच्या ठेवी व हित सुरक्षित ठेवण्यात संस्था सक्षम असून कोणीही घाबरून न जाण्याचे आवाहन चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.
आदर्श उद्योग समूह जिल्ह्यात एक भक्कम पाया असलेली तसेच ग्राहक, ठेवीदारांचा विश्वास मिळविलेली संस्था आहे. आजपर्यंत संस्थेने या विश्वासाला सार्थ करत आपल्या सभासदांना सेवा देऊ केली आहे. भविष्यातही हा विश्वास असाच कायम राहणार आहे. मात्र वरील प्रकरणी आलेल्या बातम्यांमुळे संस्थेची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत आहे. ग्राहक, ठेवीदार व खातेदारांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असे जाहीर आवाहन चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
