मुंबई : गेल्या काही आठवड्यापासुन भारतात कोरोनाच्या संसर्गाने डोके पुन्हा वर काढले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहिर करण्यात आले आहे. तसेच भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतुन अनेक विदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. याच पार्श्वभूमिवर भारतात आगामी टी-२० विश्वचषकासाठी पर्यायी देशाचा विचार आयसीसीकडून केला जात आहे.
भारतात होणारा आयसीसी टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. स्पर्धेला बराच कालावधी बाकी असला तरी, भारतातील कोरोनाची स्थिती पाहता आयसीसीने दुसऱ्या पर्यायाचा विचार सुरु केला आहे. टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीने संयुक्त अरब अमिरातीला (युएई) विश्वचषकासाठीचे राखीव ठिकाण म्हणून ठेवले आहे. जर भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर, टी-२० विश्वचषक युएईमध्ये होऊ शकेल.
या दरम्यान आयसीसी सध्या भारतातील कोविडच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आयसीसीचे शिष्टमंडळ सध्या भारतात आहे. गेल्या आठवड्यात बीसीसीआयने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी नऊ मैदानांचे प्रस्ताव ठेवले होते. यादरम्यान भारतातील कोरोनाची स्थिती पाहता ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत भारतातुन येणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे. तेव्हा विश्वचषकासाठी इतर देशातील क्रिकेट मंडळ आपले संघ टी-२० विश्वचषकासाठी भारतात पाठवण्याचा धोका पत्कारणार का हा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयुष्यभर काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवणारा एक प्रमुख चेहरा हरपला !
- कौतुकास्पद! नाशिकच्या एकलहरे गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा निर्णय
- ऑक्सिजनची समस्या कायमस्वरुपी सुटणार, नांदेड जिल्ह्याात २० ठिकाणी प्लांट उभारणी
- विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांसोबत गडकरी-फडणवीस यांची बैठक
- आयुष्यमान भव:, कोरोना संकटासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत, चाहत्यांनाही केले आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

