नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या जास्त होत असल्याने ऑक्सिजन बेड मिळणेही दुरापास्त होत आहे. हा मोठा गंभीर प्रकार आहे. यामुळे सोशल मीडियावर एक उपाहासात्मक संदेश फिरत होता. काळाची गरज पाहता यापुढे बिल्डर घराची जाहिरात देताना ऑक्सिजन बेड असल्याचा आवर्जुन उल्लेख करतील अशा प्रकारचा तो मेसेज होता. ऐकायला विनोदी असले तरी आजच्या परिस्थितीवरून ही बाब आवश्यक असल्याचे दिसून येतेय.
त्यामुळे नाशिकच्या एकलहरे ग्रामपंचायतीने भविष्यात शौचालयाप्रमाणेच एक ऑक्सिजन बेड तयार करणे बंधनकारक केले आहे. पंचायतीने केवळ बंधनकारक केले नाही तर बेडची व्यवस्था करणाऱ्याला घरपट्टीमध्ये सूटही देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे भविष्यात रुग्णालयात ऑक्सिजन मिळेलच यावर अवलंबून न रहाता जीव वाचविण्यासाठी एक आधार होणार असल्याचे ग्रामपंचायत सरपंच मोहिनी जाधव यांना विश्वास आहे.
एकलहरा ग्रामपंचायतीच्या सदस्या रत्नाबाई दिलीप सोनवणे यांना कोरोनाची बाधा झाली होती. पण कोरोनासोबत झुंज देत असताना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मनाला चटका लाऊन गेली. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या व्यक्तीला नवीन घर बांधायचे असेल त्यांनी एक ऑक्सिजन बेड तयार करण्याची सूचना केली. तसेच हा बेड बांधल्यानंतर त्यांना घरपट्टीमध्ये सूट देण्यात यावी अशी मागणी केली होती. ग्रामपंचायत सदस्यांनी हा ठराव बहुमताने मंजूर केला. अशा प्रकारचा निर्णय घेणारी एकलहरे हे पहिले गाव ठरलेय.
महत्वाच्या बातम्या
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला
- बीडमधील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा, पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र
- मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीची किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
