नांदेड: कोरोना २ लाटेत वाढलेली रुग्णांची संख्या, रेमडेसीवीर इंजेक्शन व कृत्रिम ऑक्सिजन यासाठी रुग्ण व नातेवाईकांची होणारी धावपळ आता थांबण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी २ प्लांट कार्यान्वित झाले आहेत, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली आहे.
कोरोना आजाराच्या काळात शहरातील सर्व कोविड रुग्णालये फुल्ल झाले आहेत. अनेकांना बेड मिळत नाहीत, जर बेड मिळाला तर रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यात विशेष लक्ष घातले. प्रत्येक रुग्णाला गरजेनुसार ऑक्सिजन मिळाले पाहिजे यासाठीचा एक कृती आराखडा तयार केला.
त्यातूनच आता जिल्ह्यातील विविध २० ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधाने निधीचे वितरण करण्यात आले असून शहरासह तालुक्यांच्या सर्वच मुख्यालयी वरती बांधण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकुड पुरवठा
- परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
- ‘एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबण्याची घटना मानवतेला कलंकित करणारी’
- ‘राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आणि भिन्न विचारांचे असल्याने त्यांच्यात ताळमेळ नाही’
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नावनोंदणी कशी कराल ? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

