टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीमध्ये अखेर बिघाडी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितल आहे. त्यानंतर इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी जालना येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी मेळाव्यानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलताना वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमला माझ्याकडून गुडलक असल्याची उपरोधिक टीका केली आहे. त्यामुळे एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
यावेळी बोलताना आंबेडकर यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षानं निर्णय घेतला तर आम्ही त्यांना गुडलक म्हणतो. अशा प्रकारची उपरोधिक टीका आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस असल्याचा गंभीर आरोप जलील यांनी केला होता यावरही आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.
दरम्यान, एमआयएमला सोडचिट्ठी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी ही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी बरोबर आघाडी करणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे दोनही पक्षांना याचा फायदा होऊ शकतो.
- ‘३७० हटविले, तसे आरक्षणही हटवतील’, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती
- एमआयएम मराठा-ब्राम्हण-एससी-एसटीसह सर्व समाजातील उमेदवार उभे करणार – जलील
- एमआयएमने घेतलेला निर्णय योग्यचं : रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

