Share

एमआयएमने घेतलेला निर्णय योग्यचं : रामदास आठवले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत फुट पडली आहे. एमआयएम पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपला मान राखला नाही असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

एमआयएमने घेतलेल्या या निर्णयाचं आरपीएयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत एमआयएमला वंचितमुळे काहीही फायदा झाला नाही, उलट वंचितलाच एमआयएममुळे फायदा झाला होता असं विधान केले आहे. त्यामुळे. एमआयएमने घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे असं रामदार आठवले यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना आठवले यांनी व’चित आघाडीतून आणखी काही लोक बाहेर पडतील आणि आमच्याकडे येतील असं विधान केले आहे. तसेच विरोधी पक्षनेता बनेल एवढी मतं वंचित आघाडीला मिळणार नाहीत. लोकसभेला मतं मिळाली असली तरी विधानसभेला वंचित आघाडीला फार मतं मिळणार नाहीत असंही आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते चार दिवसांपासूनच एमआयएमकडून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. वंचितकडून आठ जागांची ऑफर होती, तर एमआयएम १०० जागांसाठी आग्रही होती. त्यामुळे एमआयएमने अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!