Share

…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजेंची डरकाळी !

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना काळातील गांभीर्य ओळखून संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यानंतर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर संभाजीराजे हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच भूमिका असून आता महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन मराठा समाजाच्या भावना समजून घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची आज कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर त्यांनी सोलापुरात जाऊन पत्रकार परिषद घेतली. तसेच, समाज बांधवनशी संवाद साधलाय. ‘राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन,’ असा आक्रमक बाणा संभाजीराजे यांनी जाहीर केला आहे. सध्या त्यांच्याकडे भाजपच्या कोट्यातील राज्यसभेची खासदारकी आहे. संभाजीराजे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतील व २७ तारखेला आपली भूमिका जाहीर करतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!