Share

…हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंच पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Published On: 

जळगाव : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने पुढे गेलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी केली होती. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. तर, मोदींनी महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी व महाराष्ट्रासाठी मदतीची घोषणा न केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आता, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ज्याचे नुकसान होते, तो शेवटी देशाचा नागरिक आहे. त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. राज्यातील नागरिकांना मदत करणे, ही राज्याची जबाबदारी आहे. राज्य सरकार सध्या आढावा घेत आहे. त्यानंतर मदत करेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन मदतीची घोषणा करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा दौराही नाही केला व मदतही नाही, हा एकप्रकारे महाराष्ट्रावर अन्याय आहे. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, महाराष्ट्राला शक्य तेवढी मदत लवकर करावी,’ असं भाष्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!