Share

…अन् मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मेटेंनी केलं अजितदादांच कौतुक !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

तर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून कोणत्याही परिस्थितीत ५ जून रोजी आरक्षणासाठी मोर्चा काढणार असा निर्धार केला आहे. तसेच, आता मूक नाही तर बोलका मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या मेटेंनी आज पुण्यात ‘सारथी’ संस्थेसंदर्भात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच सारथीचा कारभार हाती घेतला असून ते समाधानकारक निर्णय घेत आहेत. मी अजितदादा यांची नुकतीच भेट घेऊन सारथीची स्वायत्तता टिकवावी ही मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी संचालक निंबाळकर यांना सूचना देत सर्व प्रश्न सोडवा असे सांगितले आहे. अजित पवार यांनी सारथी संस्थेला निधी दिला तसेच संस्थेसाठी स्वतःची अशी जागा, पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध केली हे समाधानकारक आहे,’ असं विनायक मेटे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!