Share

राज्य कसं पेटून उठेल याकडं भाजपचं लक्ष – अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

दरम्यान, आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘मराठा आरक्षणाबाबत ३१ तारखेच्या आत आम्ही अहवाल देणार आहोत. मराठा आरक्षणासाठीची कायदेशीर प्रक्रिया ही व्यवस्थित सुरु आहे. भाजपचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी आम्ही काँग्रेसतर्फे जिल्हास्तरावर करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काँग्रेसची आधीपासूनची भूमिका आहे. त्यामुळेच मागील सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर केला होता,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.

तर, ‘सर्वोच्च न्यायालयात देखील आम्ही लढलो. मात्र, भाजपने सभागृहाची दिशाभूल केली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात याबाबत बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. भाजपची आंदोलनं आणि पाठींबा हा आरक्षण मिळण्यासाठी नसून आरक्षणाच्या विरोधात आंदोलन छेडण्यासाठी आहे. भाजपला आरक्षणाशी स्वारस्य नसून राज्य कसं पेटून उठेल आणि आपला राजकीय फायदा होईल, अशी भूमिका भाजपची आहे,’ असा हल्लाबोल देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!