औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील देवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल दिनांक २२ रोजी बोरसर येथील वर्षा सोमनाथ मोरे ही महिला आपल्या डिलिव्हरी साठी आली होती.
सदर महिलेचा पती हा नेहमी मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याने तिच्या सोबत माहेरचे कोणीही आलेले नव्हते याची माहिती देवगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना कळताच त्यांनी आपल्या स्टाफ सह तेथील डॉक्टरांना भेटून सदर महिलेची काळजी घेण्याबाबत विनंती केली.
महिलेची डिलिव्हरी सुखरूप होताच त्यांनी आज सकाळी तिच्या नातेवाईकांचा शोध घेत तिचे मामा साहेबराव करांगळे शेवता येथे राहत असल्याचे कळताच त्यांनी आज सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवुन घेतले व सदर महिलेला डिस्चार्ज मिळताच त्यांनी स्वतः तिच्या घरी जाऊन आपल्या बहिनी प्रमाणे तिला साडी,नवजात बाळासाठी लागणारे कपडे,फळे व इतर साहित्य देऊन आपले भावा प्रमाणे कर्तव्य पार पाडले.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

