🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान, उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिल्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करतानाच देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय, असं देखील म्हटलं. तर, उर्वरित जन आशीर्वाद यात्रेबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे.
‘मी थांबणार नाही. मी पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याने जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी कोकणात ही यात्रा सुरु ठेवणार आहे. मोदी सरकारच्या ७ व्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात ही यात्रा काढली जात आहे. कोकणातील यात्रेचे दोन दिवस अजून आहेत. परवा पासून पुन्हा माझी जन आशीर्वाद यात्रा सुरु होईल,’ असं भाष्य नारायण राणे यांनी केलंय.
उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं ?
उच्च नायालयाने नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. सुनावणी दरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे. तसेच राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे हजेरी लावण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय’; न्यायालयाच्या दिलास्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- राणेंना कोर्टाचा दिलासा ; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून आदेश
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

