Share

‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत रात्री २४ ऑगस्टरोजी त्यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. दरम्यान महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री त्यांचा जामीन मंजूर केला. काळ दिवसभर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. आता यावरूनच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातून मंत्री राणे यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी वर जाणार नाही. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांचा चांगलाच संचार घेतला आहे. ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय. राऊतसाहेब, आरोप करणाऱ्या महिलेलाच तुम्ही जेलमध्ये दाबता. सत्तेचा दुरुपयोग करता. उपसभापती असूनही नीलमताई शिवसेना प्रवक्त्यासारखं बोलतात. त्यांनाही आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. त्या उपसभापती असूनही राणेंना दुतोंड्या कसं म्हणतात, हे कोर्टातच विचारू.’ असे मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभर सुरू असलेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झालेला असल्याचे आता स्पष्ट झाली असल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला. ‘न्यायालयात राज्य सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. या कारणाने राणे यांना न्यायालयाने पूर्णपणे जामीन दिला. यातून हेच दिसून येते की, सत्याचा विजय झाला’, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नारायण राणेंच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!