Share

“बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी…”, यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Published On: 

सिंधुदुर्ग: शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ तसेच गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. पण मातोश्री म्हणजे आपली आई असून ते 2कोटी रुपये दानधर्म करण्यासाठी आईला दिल्याचा खुलासा जाधवांनी केला आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

“अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं यापुरतं मी मर्यादित ठेवतो. सध्या अफवा किती पसरवल्या जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही,” असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

तसेच हे राजकीय षडयंत्र असून ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही तिथे या गोष्टी सुरु आहेत. ना घाबरता या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण सुरु आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोकं सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येतं त्यातून हे सुडाचं राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

विराजस–शिवानीने गुपचुप उरकले लग्न? व्हिडीओ होतोय व्हायरल  

IPL 2022 : अरेच्चा! लखनऊच्या ‘बेबी एबी’ ने केलेल्या ‘या’ विक्रमाची त्याला साधी कल्पनाही नव्हती

“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला

“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला

”मला हे सांगायचं नव्हतं..” विवेक अग्निहोत्रींचा वरुण धवन विषयी मोठा खुलासा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!