Share

कर्जत-जामखेडला विकासाच्या बाबतीत राज्यात एक नंबर बनवणार : रोहित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच युवा नेते विकासाची आश्वासने देत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मोठ विधान केले आहे.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जामखेड येथील सभेत बोलताना रोहित पवार यांनी पुढच्या काळातील अडचणी एकत्रित येऊन सोडवू या, असे आवाहन करतानाच विकास इतका करून दाखवू की २८८ आमदारांच्या मतदारसंघांपैकी विकासात एक नंबर कर्जत-जामखेड मतदारसंघ असेल असे आश्वासन रोहित पवार पवार यांनी दिले. त्याचबरोबर विकासाच्या संकल्पनाही सभेत सादर केल्या.

पुढे बोलताना त्यांनी ‘जो मी निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. हा मतदारसंघ फार वेगळा आहे. मराठ्यांची ऐतिहासिक लढाई येथे झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जन्मभूमी आहे. जगदंबमाईची ही भूमी आहे. शेतात कष्ट करणारे शेतकरी इथे आहेत हे माझं कुटुंब आहे असं विधान करतानाचं आज जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गटारे नाहीत. अशी परिस्थिती आहे. यांची विकास लावल्याची पद्धत आम्हाला मान्य नाही असंही विधान केले आहे.

दरम्यान, कर्जत – जामखेडची चर्चा राज्यात सुरू आहे. आज लाईट जी दिसते ती जनरेटरवर आहे. सर्वसामान्य लोकाच्या पोटावर पाय ठेवून भाजपाचा रथ जाणार असेल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. हक्काचं काम आपल्याला द्यायचं आहे. हाताला काम द्यायचं आहे. असंघटित कामगार आहेत त्यांना काम द्यायच आहे. युवक-युवतींच्या भविष्यासाठी काम करायचं आहे असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!