Share

शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे.  या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. आता गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारत महान देश आहे आणि आपण सगळे भारतीय यामुळं गौरवान्वित आहोत. त्यांनी म्हटलंय की, एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो अथवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘इंडिया टूगेदर’ आणि ‘इंडिया अगेनस्ट प्रोपगेंडा’ असे हॅशटॅगही दिले आहेत.

महत्वच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!