Share

देशातील जनतेसाठी आजचा दिवस आनंदाचा- संग्राम जगताप

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

अहमदनगर येथे महापालिकेच्या बुरुडगाव रोड येथील जिजामाता दवाखान्यात अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना पहिली लस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी आ.संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, महिला बालकल्याण समिती सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेणप्पा, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, नगरसेविका मीना चोपडा, संजय चोपडा, बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, डॉ.अनिल बोरगे, डॉ.बापूसाहेब कांडेकर व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण विश्वातील मानव जातीवर कोरोना संसर्ग विषाणूचे महाभयंकर संकट आले होते. देशातील शास्त्रज्ञांनी व तज्ज्ञांनी यावर औषध व लस शोधण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. संपूर्ण देशवासियांच्या आशिर्वादाच्या जोरावर अखेर प्रभावी लस शोधण्यास आपला देश यशस्वी झाला. आज सबंध मानवजातीसाठी आनंदाची बाब म्हणजे या विषाणूवरील यशस्वी झालेल्या लसीचे प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाले आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!