Share

राष्ट्रवादीला मोठा दिलासा; मी पवार साहेबांसोबतचं राहणार : भुजबळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधान आले होते.

भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत.

या बैठकीआधी बोलताना मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. शिवसेना प्रवेशाच्या केवळ वावड्या उठवला जात आहेत. माध्यमांना खोटी माहिती देणारे सूत्र कोण आहेत हे सांगावं तसेच मी साहेबांसोबतच आहे ,आज बैठकीला आलोय. आता बास इतकच असं विधान केले आहे. त्यामुळे भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला आता पूर्णविराम मिळाला आहे. भुजबळांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत राहणार आहेत ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत असे त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील चित्रा वाघ, सचिन आहिर, धनंजय महाडिक, वैभव पिचड, याच्या सह अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच रश्मी बागल आणि दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!