Share

सुरुवातीलाच वाद झाला तर काय होते मला माहिती ते टाळण्यासाठी मी शिवसेनेत 

Published On: 

औरंगाबाद: मी भाजपमध्ये जाणार होतो पण भाजपच्या स्थानिक लोकांनी विरोध केला. सुरुवातीलाच वाद झाला तर काय होते हे मला माहिती असल्याने मी भाजपा ऐवजी शिवसेनेत जात आहे असे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्र देशा शी बोलताना सांगितले. दरम्यान सत्तार यांनी सकाळीच मेलवरून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून दिला आहे.

सिल्लोड मतदार संघाची जागाही भाजपच्या वाट्याला असली तरी युती झाल्यानंतर शिवसेनेचे वाटेल ती जागा येणार आहे. त्यामुळे मी विधानसभेसाठी मोठ्या फरकाने विजय होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे ही सत्तार यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांचा शिवसेना प्रवेश

कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कॉंग्रेस अजूनच कमकुवत झाली आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासुन सूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान सत्तार भाजप प्रवेश करणार असल्याचं बोलले गेले. मात्र भाजपकडून त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!