टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधान आले आहे.
पण छगन भुजबळ यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे की,छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत राहणार आहेत ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत असे त्या म्हणाल्या . त्या पुण्यात प्रसारमाध्यमाशी बोलत होत्या.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील चित्रा वाघ , सचिन आहिर, धनंजय महाडिक, वैभव पिचड, याच्या सह अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छगन भुजबळ हे पण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती.पण ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी आज सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

