Share

‘झाला तर दिल्लीतचं होणार उदयनराजेंचा भाजप प्रवेश’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सातारचे खा. उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहे. तर उदयनराजे भोसले हे दिल्लीत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले हे नक्कीच भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितल जात आहे. मात्र याबाबत उदयनराजे यांनी अजूनतरी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे पक्ष प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, उदयनराजे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. पण उदयनराजे दिल्लीत पक्षप्रवेश करणार आहेत. उदयनराजे हे राजे आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असा पक्ष प्रवेश होणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान गेले काही दिवस उदयनराजे भोसले हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तर उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार भेटीगाठी देखील होत आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर याबाबत खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे. उदयनराजे भोसले लवकरच भाजपात येणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!