टीम महाराष्ट्र देशा: छगन भुजबळ व नारायण राणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेनेतून फोडले होते. सत्तेत असताना त्यांनी जे केल तेच चित्र आज त्यांना पहायला मिळत आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. नारायण राणे यांना काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं, असा दावाही कदम यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षातील दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच मुद्यावरून रामदास कदम यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडताना शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूर येथे बैठक झाली होती. मात्र अपेक्षित मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे राणे दिल्लीत काँग्रेसच्या दरबारी गेले.
छगन भुजबळ यांना देखील शरद पवार यांनीच फोडले, ज्या ज्या नेत्यांनी बाळासाहेबांना दु:ख दिलं ते सर्व भुईसपाट होत आहेत, असा घणाघात कदम यानी केला आहे. दरम्यान, नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास युती करयाची का नाही, याबाबत शिवसैनिकांच्या मनात प्रश्न आहे, असही कदम म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
…तर शरद पवारांची राष्ट्रवादी दिसणार नाही : शाह
चंद्रकांत दादांच्या टोल्यावर विश्वजीत कदमांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

